@maharashtracity

मुंबई: कोविड काळात मधुमेहाची बरीचशी माहिती मुंबई महापालिकेला मिळाल्याने हा आजार आता कोणत्याही वर्गातील नागरिकाला जडत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महानगर पालिकेने २४ प्रशासकीय प्रभागातील किमान एका दवाखान्यात मधुमेह क्लिनीक (Diabetic clinic) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

माझे कुटूंब माझी जबाबदारी (My Family My Responsibility) या अभियानाअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात मुंबईतील नागरीकांच्या बहुतांश आरोग्याची माहिती पालिकेला उपलब्ध झाली आहे. त्यातून मधुमेह क्लिनीकबाबत निर्णय घेतला आहे.

या क्लिनीकमध्ये आठवड्यातील काही दिवस आहार तज्ज्ञही हजर राहाणार आहे. तसेच मधुमेही रुग्णांची माहिती प्रत्येक प्रभागातील वॉर रुमला दिली जाणार आहे. या वॉररुममधून रुग्णांशी संपर्क साधला जाणार आहे. रुग्णांच्या औषध उपचारांसह उपचार थांबवले असल्यास पालिकेमार्फत ते उपचार पुन्हा सुरु करण्यात येतील असे सांगितले.

Also Read: लालबागमध्ये १५५ जणांनी केले रक्तदान

मधुमेह हा पुर्वी श्रीमंताचा आजार मानला जात होता. मात्र, आता या आजाराचे स्वरुप बदलत असल्याने बदलत्या जीवनशैलीशी संबंधित झला आहे. आहारातील बदललेल्या शैलीमुळे चाळी, बैठ्यावस्त्यांमध्येही मधूमेहाचे रुग्ण आढळू लागले आहेत.

शिवाय लहान मुलांमध्ये हा आजार आढळू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) २४ वॉर्डातील किमान एका दवाखान्यात मधुमेह क्लिनीक सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, ठराविक दिवसात या क्लिनीकमध्ये आहार तज्ज्ञही उपस्थीत राहातील असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here