@maharashtracity

मुंबई: मुंबईचे उप महापौर अ‍ॅड. सुहास वाडकर यांनी कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स,लंडन (World Book of Records, London) यांच्याकडून घेण्यात आली असून त्यांना “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” देऊन गौरविण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती अ‍ॅड. सुहास वाडकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा (corona pandemic) प्रादुर्भाव सुरू झाला. मात्र, या कोरोनाच्या कालावधीत उप महापौर अ‍ॅड. सुहास वाडकर यांनी, त्यांच्या विभागातील अनेकजणांना अन्न- धान्य, खाद्यपदार्थ वाटप, वैद्यकीय मदत केली. तसेच, अनेक गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी रात्री, अपरात्री सहकार्य केले व आजही करीत आहेत.

तसेच, कोरोनाग्रस्त रुग्णांना व्यवस्थित वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी स्वतः वैक्तिक स्तरावर आणि अनेकदा महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासमवेत विविध रुग्णालयात भेटी देऊन पाहणी केली. रुग्णालयीन त्रुटी दूर करून रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा, सुविधा देण्यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाला, आरोग्य यंत्रणेला निर्देश देऊन सर्वतोपरी प्रयत्न केले.

उप महापौर अ‍ॅड. सुहास वाडकर यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनकड़ून घेण्यात आली आहे. त्यांना “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनचे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्तीसाठी जनजागृति केली जात आहे. तसेच, कोरोना मुक्तीसाठी कार्य करण्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कामगिरीतून इतरांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संबंधित व्यक्ती, संस्था यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनकड़ून “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड)” देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.

या उपक्रमाच्या अंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर यांना मुंबई महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड)ने सम्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here