दिवसभरात १ मृत्यू तर १३ गोवर रुग्ण

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गोवर मृत्यू तपासणीच्या आजच्या अहवालानुसार भिवंडी (Bhiwandi) येथील आठ महिने मुलाचा गोवर संशयित मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी असे सलग तीन दिवस गोवर संशयित मृत्यू (death by measles) नोंदविण्यात येत आहेत. 

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात आठ तर मुंबई महानगर प्रदेशात एकूण १२ गोवर (Govar) मृत्यू झाले आहेत. रुग्ण संख्या घटत असली तरी देखील रोजच्या गोवर मृत्यूने चिंतनीय स्थिती झाली आहे. तसेच अहवालानुसार बुधवारी १३ नवे गोवर निश्चित रुग्णांची नोंद करण्यात आली. यात ए वॉर्ड ३, डी वॉर्ड १, एफ उत्तर १, पी उत्त २, आर उत्तर २, एन १, तर एस वॉर्डात ३ असे १३ रुग्णांची नोंद करण्यात आली.    

दरम्यान, बुधवारी निश्चित झालेल्या गोवर मृत्यूतील आठ महिन्याचा मुलगा ठाणे (Thane) जिल्हयातील भिवंडी येथे राहत असून त्याला १८ नोव्हेंबरपासून ताप येण्यास सुरुवात झाली. तसेच २० नाव्हेंबरपासून बाळाच्या शरिरावर पुरळ दिसू लागली. या बाळाला एक लसीचा डोस देण्यात आला असल्याचे समजते आहे. तर २२ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या रुग्णालयात (BMC Hospital) सायंकाळी दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास असल्याने इन्क्युबेट करुन उपचारास सुरुवात झाली. मात्र रात्री सव्वा नऊ वाजता त्याचे निधन झाले. मृत्यूचे कारण शवविच्छेदनातून समजेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

आजपर्यंत २३३ निश्चित गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत ३ लाख ४० हजार ९०८ घरांची तपासणी करण्यात आली असून यातून १५६ ताप आणि पुरळ असलेले रुग्ण आढळून आले. तर ७५ लसीकरण सत्रातून २५८ जणांना एमआर१ तसेच ३०४ जणांना एमएमआर लस देण्यात आली. शिवाय १९१ अतिरिक्त सत्रातून ५१६ जणांना एमआर१ तर ७५६ जणांना एमएमआर लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here