@maharashtracity

मुंबई: मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत लवकरच ओडिसा, चेन्नईच्या मगरी, सुसरी या मुंबईकरांच्या भेटीला दाखल होणार आहेत. या खास मगरी (Crocodile) सुसरी यांना बघण्यासाठी महापालिका प्रशासन तब्बल २० कोटी रुपये खर्चून नवीन ‘व्ह्युविंग गॅलरी’ (viewing gallery) बनवणार आहे. त्यामुळे राणी बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखीन भर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यासंदर्भातील माहिती राणी बाग (Rani baug) प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. राणी बागेत दररोज हजारो पर्यटक पेंग्विन (Penguin), अन्य पक्षी अणि इतर प्राणी यांना बघण्यासाठी येत असतात. तर रविवारी, सुट्टीच्या दिवशी राणी बागेत पर्यटकांच्या गर्दीत आणखीन भर पडत असते. गेल्या काही वर्षांपासून राणी बागेच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आता लवकरच या राणीच्या बागेत, नंदनकाकन, ओडिसा (Odisha) आणि क्रोकोडाइल बँक चेन्नई (Crocodile Bank, Chennai) येथून आणखीन काही मगरी, सुसरी आणण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून संबंधित ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे.

अंडर वाॅटर व डेक व्ह्युविंग गॅलरी

मुंबई महापालिकेने राणी बाग प्राणी संग्रहालयात वाघांसाठी ज्याप्रमाणे काचेची ‘व्ह्युविंग गॅलरी’ तयारी केली आहे, त्याप्रमाणे मगर, सुसरीसाठीही दर्शनी भाग बनवण्यात येणार आहे. यामध्ये जाऊन ‘अंटर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहता येणार आहेत. पालिका मगरीसाठी १,५०० चौ. मीटर जागेत व्ह्युविंग गॅलरी बनवणार आहे. सध्या या ठिकाणी असणार्‍या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मासे, बफेलो बिफ, चिकन असे खाद्य दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here