@maharashtracity
मुंबई: कोंकणातील पुरग्रस्तांसाठी मुंबई महापालिकेतील (BMC) भाजप नगरसेवकांनी (BJP corporators) त्यांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेही आपल्या २९ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचे मुंबई (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)/यांनी, पालिकेतील काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी, काँग्रेसच्या २९ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्याबाबतचे लिखित पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले आहे.
कोकणात चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण होऊन दरड कोसळली होती. या दुर्घटनेत अनेकजण मृत पावले तर अनेक कुटुंबे बेघर झाली. बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरल्याने दुकाने, घरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे येथील पुरग्रस्तांना काही मदत मिळावी यासाठी मुंबई महापालिकेतील भाजप पक्षाने पुरग्रस्तांना एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्यास २४ तास उलटण्यापूर्वीच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या २९ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन पुरग्रस्तांना (One month salary to flood affected people) मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.