@maharashtracity
मुंबई: पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय (Cooper Hospital) गेली ५ वर्षे कॅथ लॅब (Cath lab) आणि इतर सुविधेच्या प्रतिक्षेत आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr Deepak Sawant) यांनी कॅथ लॅबच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी कूपर हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी बैठक घेण्यात आली. येत्या नव्या वर्षात कूपर रुग्णालयात कॅथलॅबची उभारणी करण्यात येईल अशी आशा दिसून येत आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उदघाटनाच्या वेळी कॅथ लॅब (catheterization laboratory) व इतर सुविधा देण्याचे घोषित केले होते. मात्र ही कॅथ लॅब, सुसज्ज बर्न युनिट नेफ्रोलॉजी (Burn unit, nephrology) आणि शवागार, डीएनबी सीपीएस पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा आणि सुपरस्पेशालिटीच्या (Super Speciality) जागा अद्याप प्रलंबित आहेत.
डॉ.सावंत यांनी महापालिका आयुक्तांसोबत नुकतीच बैठक घेतली होती. हॉस्पिटलचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी कॅथ लॅब २०२२ च्या जानेवारीपूर्वी कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. तर येथील शवविच्छेदन केंद्र महापालिकेला सुपूर्द करण्याच्या मुद्यावरही काही अडचणी आहेत.
दरम्यान डॉ. दीपक सावंत यांनी पोस्ट मॉर्टम कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनासाठी प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रक्रियेतील विलंब टाळला जाईल, जखमा धुण्यासाठी व ड्रेसिंग करण्यासाठी बर्न युनिट आवश्यक आहे. बर्न युनिट आणि ड्रेसिंगसाठी बर्न वॉर्डमध्ये ठेवण्याची त्यांनी विनंती करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. या ठिकाणी पदव्युत्तर जागा, सिव्हील इंजिनीअर (civil engineer), इलेक्ट्रीकल इंजिनीअर (electrical engineer) यांच्या जागा कमी असल्याकडे लक्ष वेधले आहे.