@maharashtracity

पालिकेचे खासगी रुग्णालयांना फर्मान

मुंबई: मुंबईत कोविड, ओमायक्रॉन रुग्णांची (omicron patients) वाढती संख्या पाहता पालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात (beds in private hospitals) घेण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली आहे. येत्या ११ जानेवारपर्यंत खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील एकूण बेड्सपैकी सध्या ८० टक्के बेड्स पालिकेच्या ताब्यात देण्याचे फर्मान खासगी रुग्णालयांसाठी काढले आहे.

मुंबईत (Mumbai) गेल्या ४८ तासांपूर्वी कोविड बाधित रुग्णांची (covid patients) संख्या १५ हजारांवर गेली होती. तर गेल्या २४ तासात हीच संख्या थेट २० हजारांवर गेली आहे. त्यामुळे पालिकेला कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (third wave of covid) अचूक अंदाज आला असून या लाटेच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून पालिकेने आता कोविड नियम कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटर (Jumbo Covid Centres) येथील बेड्सची संख्या कमी पडू नये, सर्व कोविड बाधितांना उपचार मिळावेत आणि त्यासाठी आवश्यक बेड्स उपलब्ध करण्यासाठी पालिकेने नियोजित आराखड्याप्रमाणे खासगी रुग्णलयातील बेड्स ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

त्यासाठी सर्व खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होममधील (Nursing homes) ८० टक्के खाटा येत्या ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात द्या, असे फर्मान काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here