@maharashtracity

पालिका शाळांमध्ये दोन दिवसांत सॅनिटायझर फवारणी

मुंबई: कोरोनापासून बचाव होण्यासाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण (vaccination of children) झालेले नसले तरी मुंबई महापालिका (BMC) शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत १,१५९ शाळांच्या सुमारे ५०० इमारतीमध्ये सॅनिटायझर (sanitiser) फवारणी व शाळा स्वच्छ करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने विद्यार्थ्यांना मास्क (mask) घालणे बंधनकारक असणार आहे. तसेच, हात धुण्यासाठी साबणची व्यवस्थाही केली जाणार आहे. शाळेत शारीरिक अंतर (Physical distance) राखण्यात येणार आहे. कोरोनाबाबतच्या (corona) सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी तर शहर भागात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत.

मात्र, आता कोरोनाबाबतची सध्याची स्थिती व रुग्ण संख्या आदी बाबी पाहता इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here