@maharashtracity
मुंबई
दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः पुढाकार घेऊन पुढे पुढे करत आहेत. त्यांचा हा पुढाकार युवा सेनेला अडचणीत आणण्यासाठी तर नाही ना? असा खोचक प्रश्न उपस्थित करून भाजप आमदार नितेश राणे यांनी पेडणेकर यांचे आभार मानले आहेत. महापौर या भाजपलाच मदत करत असल्याचा दावा राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले, महापौर किशोरीताई पडणेकर यांना संजय राऊत दिशा सालियनवर चर्चा नको असे पत्रकार परिषदेत ठणकावत होते. पण ताई थांबल्या नाहीत. त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहीले आणि सालियन परिवाराला मिडीयासोबत भेटही दिली.  
“इतकेच नाही तर मागे त्यांनी त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात असे स्वतःच जाहीर केले. त्यांचा हा उत्साह कदाचित आदित्य ठाकरेंनी जेंव्हापासून छूपी घोषणा केली की पंचेचाळीस वय वर्षवरच्या नगरसेवकांचे तिकीटे कापले जाईल त्यामुळेच असेल,” असे राणे म्हणाले.

राणे पूढे म्हणाले, मुळात या प्रकरणाचं राजकारण सेनेच्या अंतर्गत वादामुळं होतंय. ज्याप्रमाणे राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्ररकरणाची रसद आतल्या गोटातूनच मिडीयाला देण्यात आली होती. तसेच काही आदित्यच्या युवासेनेला लगाम घालण्यासाठी घडत आहे. 
स्वार्थापोटी का होईना पण महापौर आमचा लढा लढतायेत, असे सांगून नितेश राणे यांनी महापौर यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here