@maharashtracity

पालिकेकडून वाढीव खर्चाचे समर्थन
प्रस्तावात वाढीव खर्चाबाबत तरतूद असल्याचे कारण
कंत्राटकामात १५% पेक्षाही अधिक वाढीचा उल्लेख न करण्याबाबत पालिकेची चूक

मुंबई: असे म्हणतात की शहाण्याने कोर्टाची व डॉक्टराची पायरी चढू नये. कारण या दोन्ही ठिकाणी खर्च किती होईल ते सांगता येत नाही. खर्च वाढत वाढतच जातो. मात्र मुंबई महापालिकेने (BMC) वांद्रे भाभा रुग्णालयाच्या विस्तारिकरणाच्या (Expansion of Bhabha Hospital) कामाची पायरी चढण्याचे काम केले व या कंत्राटकामाचा मूळ खर्च विविध कारणास्तव रुपये २५५.९० कोटींवरून २६६.२१ कोटी रुपये, पुढे आणखीन वाढून २८७ कोटी आणि आता आणखीन वाढून थेट ३०१.९१ कोटी रुपयांवर गेला आहे.

या कंत्राटकामात तब्बल ४६.०१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी यापूर्वीही आला होता. त्यावर सर्वपक्षीय गटनेते, सदस्यांनी आक्षेप घेऊन व काही प्रश्न उपस्थित करीत पालिकेकडे स्पष्टीकरण मागितले होते.

त्यावर पालिकेने या कंत्राटकामाच्या प्रस्तावात, कंत्राटकामात काही बदल झाल्यास, यंत्रसामग्री, मनुष्यबळ यांची वाढ झाल्यास कंत्राट खर्चात किमान ५% , १०% वाढ होण्याबाबत तरतूद असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच, खर्चात अधिकतर १५% पर्यंत अथवा त्यापेक्षाही जास्त वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, त्याबाबतचा उल्लेख प्रस्तावात करण्याचे अनावधानाने राहून गेले, असे स्पष्टीकरण देत पालिका प्रशासनाने कंत्राट खर्चात रुपये ४६ कोटीने वाढ होण्याचे समर्थन केले आहे.

आता पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आल्याने या प्रस्तावावरून विरोधी पक्ष आणि पहारेकरी भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा जोरदार आक्षेप घेतला जाण्याची व या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला विरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत मुंबईसह राज्याच्या अगदी देशाच्या कानाकोपऱ्यामधून हजारो रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या केईएम (KEM Hospital), सायन (Sion Hospital), नायर (Nair Hospital) व राजावाडी, भगवती, अगरवाल, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कुर्ला भाभा आदी सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.

या सर्वसाधारण रुग्णालयांपैकी एक वांद्रे येथील भाभा रुग्णालय आहे. या रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी रुग्णालयाचे विस्तारिकरण करण्याचे काम २०१९ पासून सुरू करण्यात आले असून ४ वर्षात हे काम पूर्ण करावयाचे आहे.

यामध्ये रुग्णालयाच्या जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निष्कासन करून नव्याने १४ मजली इमारत उभारण्यात येत आहे. हे काम प्रगतीपथावर आहे.

पालिकेकडून वाढीव खर्चाचे समर्थनपालिकेकडून वाढीव खर्चाचे समर्थनपालिकेकडून वाढीव खर्चाचे समर्थन
प्रस्तावात वाढीव खर्चाबाबत तरतूद असल्याचे कारण
कंत्राटकामात १५% पेक्षाही अधिक वाढीचा उल्लेख न करण्याबाबत पालिकेची चूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here