Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईत बहुतांश ठिकाणी समाधानकारक दर्जाची हवा झाली आहे. तर सरासरी संपुर्ण मुंबई शहरातील हवा चांगल्या वर्गात मोडणारी होती. मुंबईच्या हवेत उष्मा कायम असून बिपरजॉज चक्रीवादळामुळे मुंबईतील हवा ढगाळ झाली आहे. या ढगाळ वातवरणाने मुंबईचे प्रदुषणही कोंडल्याप्रमाणे झाले आहे. मुंबईतील सहा ठिकाणी हवेचा दर्जा समाधानकारक वर्गात मोडणारा असल्याची नोंद सफर प्रकल्पाकडून सोमवारी करण्यात आली.
दरम्यान, सोमवारी मुंबई शहरातील हवा चांगल्या दर्जाची होती. येथील हवा दर्जा निर्देशांक २७ एवढा नोंदविण्यात आला होता. तर नऊ ठिकाणांपैकी सहा ठिकाणी हवा समाधानकारक वर्गात मोडणारी होती. उर्वरित ठिकाणी मध्यम तसेच चांगली अशा वर्गात मोडणारी असल्याची नोंद करण्यात आली. यातील वरळी आणि माझगांव येथील हवा चांगल्या गटात मोडणारी होती. तसेच येथील एक्युआय अनुक्रमे २९ आणि ४२ असा नोंदविण्यात आला.
भांडुप उपनगरातील हवा मध्यम दर्जाची असून येथील हवा दर्जा निर्देशांक १५३ एवढा नोंदविण्यात आला. तर कुलाबा आणि मालाड येथील हवा समाधानकारक दर्जाची असून येथील हवा दर्जा निर्देशांक अनुक्रमे ६६ आणि ६५ असा नोंदविण्यात आला. कुलाबा, मालाड, बोरिवली, कलानगर, चेंबुर, नवी मुंबई येथील हवा समाधानकारक वर्गात मोडणारी असून येथील हवा दर्जा निर्देशांक अनुक्रमे ६६, ६५, ७३, ७५, ६८, आणि ८२ असा नोंदविण्यात आला.