Twitter: @maharashtracity
मुंबई: गेल्या आठवड्यापासून मुंबईतील वातावरणात दिसून येणारे धुके हे धुके नसून प्रदुषित धुरके असल्याची बाब आजच्या “सफर” च्या नोंदीवरून समोर आल. मुंबईतील हवेचा दर्जा (air quality of Mumbai) सोमवारी कमालीचा घसरलेला दिसला. सोमवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ इतका नोंदविण्यात आला. हा निर्देशांक दिल्लीतील हवा प्रदूषणाच्या (air pollution in Delhi) दर्जाच्या अगदी जवळ जाणारा आहे. तसेच कुलाबा आणि अंधेरीसारख्या ठिकाणी हवेच्या दर्जाला अनुक्रमे अतिशय वाईट आणि वाईट असा नोंदविण्यात आला. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तिंना इशारा देतांनच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.
दरम्यान, हवेचा निर्देशांक सांगणारी “सफर” प्रकल्पाच्या माहितीनुसार सोमवारी कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३३६ इतका नोंदविण्यात आला असून येथील हवेचा दर्जा अतिशय वाईट अशा शेऱ्यात मोडला. त्यामुळे येथील वायू प्रदूषण आरोग्यास धोक्याची सुचना देणारे आहे. प्रत्येक जण थोड्या फार प्रमाणात आरोग्य समस्यांना सामोरे जाऊ शकतात. तसेच बाहेर फिरणे टाळा. त्याचवेळी शक्य झाल्यास मास्क वापरण्याचा सल्ला देणत आला आहे.
तर त्या खालोखाल अंधेरी येथील निर्देशांक २१५ इतका असून हा देखील वाईट दर्जात मोडणारा असून संवेदनशील लोकांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरू शकतो. ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना इशारा देण्यात आला आहे. तसेच वरळी येथील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६९ इतका नोंदविण्यात आला. येथील हवा मध्यम प्रतीचा तर या जोडील बोरिवली येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १८३ इतका असून तो ही मध्यम दर्जात मोडत आहे. येथील हवा किंचित बरी असली तरी देखील वायू प्रदुषणास संवदेनशील असणाऱ्या लोकांसाठी थोडी आरोग्य समस्या उद्भवू शकते असे सांगण्यात आले.
नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १५९ इतका असून मध्यम प्रतीत मोडणारा आहे. अशा खराब हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.