#वैद्यकीय तज्ज्ञांचा मास्क वापराचा सल्ला

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गुरूवारी निकृष्ट पातळीवर घसरला असून बहुतांश ठिकाणी प्रदूषणापासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येत होता. तसेच गुरुवारी मुंबईतील प्रदूषण दिल्लीहून वाईट होते.

माझगावात सर्वाधिक वाईट प्रदूषण निर्देशांकाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत श्वसनाचे विकार वाढणार असून मास्क वापर केल्यास चांगले राहिल, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. माझगाव येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३७२ एवढा नोंदविण्यात आला असून हा निर्देशांक सर्वाधिक आहे. 

प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याने मास्क वापरणे उचित असल्याचे आरोग्य विभागाकडून (health department) सुचविण्यात आले आहे. मालाड येथे ३४३ एवढी हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality index) असून येथील हवादेखील अतिशय वाईट गणण्यात येते. वायू प्रदुषण (Air Pollution) येथे टिपेला असून आरोग्य परिणाम जाणवू शकतात. श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

चेंबूर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३४२ एवढे असून हवा अतिशय वाईट आहे. प्रत्येकाला त्रास होणार असल्याचा अंदाज आहे. मास्क वापरणे चांगले असे सुचविण्यात आले. अंधेरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३२४ असल्याने प्रत्येकावर कमी – अधिक प्रमाणात आरोग्य परिणाम जाणवू शकतात. बाहेर फिरणे टाळा. प्रदूषण मास्क वापरणे. वरळी येथे ३१२ हवा गुणवत्ता निर्देशांक असून आरोग्यासाठी इशारा देण्यात आला आहे. 

श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर बीकेसी येथे ३०६ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदविण्यात आला. या ठिकाणी अतिशय वाईट हवामान असा शेरा देण्यात आला असून प्रत्येकावर कमी अधिक प्रमाणात परिणाम जाणवू शकतात. मास्क वापरणे योग्य असे सुचविण्यात आले आहे. 

नवी मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक १६९ असल्याने हवेची ही स्थिती स्वीकारार्ह असली तरी वायू प्रदुषणास संवेदनशील राहू शकते. संवदेनशील तसेच लहान मुलांवर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गामध्ये वाढ झाली आहे. ओपीडीमध्ये दररोज २-३ केसेस दिसतात. तसेच गंभीर दमा, ब्राँकायटिसचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या आठवड्यापासून अशा प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here