तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी वाहनांची जबाबदारी सांभाळत असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते ; महाराष्ट्र सिटी ची शक्यता खरी ठरली
X : @Rav2Sachin
मुंबई : “तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!”
( https://www.maharashtra.city/breaking-news/mumbai-news-non-technical-deputy-chief-fire-officer-is-in-charge-of-the-vehicles/) या मथळ्याखली प्रकाशित केलेल्या बातमीद्वारे अग्निशमन दलाचे वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, ही बाब उजेडात आणली होती.
हीच शक्यता वास्तवात घडली आहे. वडाळा फायर स्टेशनचे फायर इंजिन MP – ३३ ही गाडी भायखळा वर्कशॉप येथून वडाळा आरटीओ येथे पासिंग करायला जात असताना पूर्व द्रुतगती मार्गावर अचानक पेट घेतला. मात्र यंत्राचालकाच्या सावधगिरीमुळे गाडीला लागलेली आग विझविण्यात यश मिळाले. आगीचा थरार हा अर्धातास पूर्व द्रुतगती सुरु होता. सुदैवाने कोणतेही जीवित्तहानी घडली नाही.
मुंबई अग्निशमन दलाचे ३५ फायर स्टेशन आहे. येथील प्रत्येक फायर इंजिन वाहनांसोबत अन्य वाहने दरवर्षी आरटीओ कार्यालयातर्फे पासिंग करुन घेणे बंधनकारक आहे. याकरीता प्रत्येक वाहन सुस्थितीत ठेवली जातात. अग्निशमन दलाच्या गॅरेज मध्ये वाहनांची नियमितपणे दुरुस्ती केली जाते.
वडाळा अग्निशमन दलाचे फायर इंजिन MP – ३३ या वाहनाचे आरटीओ कार्यालयाद्वारे पासिंग केले जाणार होते. याकरिता फायर इंजिन अग्निशमन दलाच्या भायखळा वर्कशॉप येथे आणण्यात आले होते. येथे फायर इंजिन वाहनांची दुरुस्ती करण्यात आली होती. शुक्रवारी (२२ मार्च २०२४) दुपारी भायखळा वर्कशॉप येथून फायर इंजिन MP – ३३ वडाळा आरटीओ येथे पासिंग करण्यासाठी निघाले. मात्र वडाळा येथील पूर्व द्रुतगती मार्गावर फायर इंजिन MP – ३३ अचानक पेट घेतला. मात्र यंत्राचालकाच्या सावधगिरीमुळे फायर इंजिनला लागलेली आग विझविण्यात यश मिळाले. आगीचा थरार हा अर्धातास पूर्व द्रुतगती सुरु होता. सुदैवाने कोणतेही जीवित्तहानी घडली नाही.
दरम्यान, महाराष्ट्र सिटी (Maharashtra.city) ने प्रकाशित केलेल्या बातमीत नमूद केले होते की, 1965 च्या आधी प्रत्येक अग्निशमन केंद्रे आपआपल्या वाहनांची दुरुस्ती विभागीय पातळीवर करुन घेत होते. यासर्व वाहनांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व प्रथम 1965 मध्ये तांत्रिकी विभागात केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) हे पद निर्माण केले गेले. या पदासाठी मोटार मॅकेनिकल अभियंताची नियुक्ती केली गेली होती. या पदावरील अभियंता २५ वर्षे सेवेत कार्यरत राहून ते सहाय्यक विभागीय अधिकारी (कार्यदेशक) पदावरुन निवृत्त झाले.
याच दरम्यान 1984 मध्ये महापालिकेच्या शहर अभियंतांनी एका कनिष्ठ अभियंता यांना अग्निशमन दलात नियुक्त केले. पुढे याच कनिष्ठ अभियंतांने मोटार मॅकेनिकल आणि यांत्रिकी विभागातून अभियंता असल्याने त्यांची 1992 या वर्षी अधिकृत निवड पध्दतीने त्यांना केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) पद दिले. ते केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) नंतर सहाय्यक विभागीय अधिकारी आणि पुढे उप प्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. ते 38 वर्षे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते 2021 या वर्षी निवृत्त झाल्यावर उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर कोणत्याही अभियंतांची नियुक्ती न करता या पदाची संपूर्ण जबाबदारी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना सोपविण्यात आलेली आहे.
उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना वाहनांबद्दल कोणतेही ज्ञान नाही. ते कोणत्याही यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिकलमधून अभियंता पदवीधारक झालेली नाहीत. वाहनांसंदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडे वाहनांबद्दल दैनंदिन अहवाल सुपूर्द केल्यावर त्यावर कोणत्या आधारावर निष्कर्ष काढून निर्णय घेत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच त्यांना वाहनांबद्दल काडीमात्र ज्ञान नसतानाही परदेशातून वाहन आणण्याची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर त्वरित ऑटो मोबाईल कार्यकारी अभियंताची नियुक्ती करुन त्यांच्याकडे वाहनांची संपूर्ण जबाबदारी सोपविणे महत्वाचे आहे. अन्यथा पुन्हा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न जाणकरांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, घडलेल्या दुर्घटनेतून आता तरी पालिका प्रशासनाने धडा घेऊन तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारीच्या जागेवर पूर्वी प्रमाणे (५८ वर्षे) अग्निशमन दलातील सर्व वाहनांची जबाबदारी उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदाकडे देऊन या पदावर मोटार मॅकेनिकल अभियंताची नेमणूक करुन त्यांच्या हाताखाली यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिक अभियंतांची कनिष्ठ, दुय्यम आणि सहाय्यक अभियंता पदी नेमणूक करुन एक सक्षम पथक तयार करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Also Read: BMC : सहाय्यक अभियंतांची मागणी आम्हाला आमच्या हक्काची सेवा ज्येष्ठता पदोन्नती द्यावी