७ दाखल, १८ डिस्चार्ज तर ५२ जणांवर ओपीडीमध्ये उपचार
Twitter : @maharashtracity
मुंबई
मुंबईत आज झालेल्या दही हंडी उत्सवात दिवसभरात ७७ गोविंदा जखमी झाले असून काहींना किरकोळ जखमा झाल्याने उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर काहींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात जखमी गोविंदावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली होती. विशेष वॉर्ड तयार करण्यात आले होते. दरम्यान, यंदाच्या दहिहंडी उत्सवात गोविंदा जखमींची संख्या कमी असल्याने दिलासा मिळत आहे. याबाबत गोविंदा पथाकांनी केलेला सराव तसेच सुरक्षितेच्या सुचना पाळल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी गोविंदांना उपचारासाठी मुंबईतील पालिकेसह राज्य सरकारच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात केईएममध्ये २६ गोविंद आले, यातील ४ जणांना दाखल करुन घेण्यात आले. तर २४ जणांवर उपचार सुरु आहेत.
सायन हॉस्पिटलमध्ये ७ जण आले असून सातही जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच नायर रुग्णालयात निघांना घेऊन आले. यात एकाला ओपीडीमध्ये उपचार देण्यात आले. तर दोघांना उपचार करुन कालांतराने सोडण्यात आले. जे जे हॉस्पिटलमध्ये चौघांना दाखल करण्यात आले होते. यातील दोघांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांना घरी सोडण्यात आले. तर सेंट जॉर्ज रुग्णालयात एकावर उपचार करुन सोडण्यात आले. जीटी हॉस्पिटलमध्ये दोघांवर ओपीडीमध्येच उपचार करुन सोडले. पोद्दार हॉस्पिटलमध्ये चौघेजण उपचारसाठी आले, यातील तिघे जणांवर उपचार सुरु आहेत. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला.
बॉम्बे हॉस्टिलमध्ये एकावर उपचार सुरु आहे. तसेच राजावाडी रुग्णालयात आठ जणांपैकी दोघ दाखल असून १ निरीक्षणाखाली असून पाच जणांना सोडण्यात आले. शताब्दी रुग्णालयात दोघांवर उपचार करुन सोडण्यात आले. वांद्रे भाभा रुग्णालयात दोघांवर उपचार करुन सोडण्यात आले. तर व्हि एन देसाई रुग्णालयातही दोघांवर उपचार करुन सोडण्यात आले. कुपर रुग्णालयात ४ चौघांवर तर ट्रॉमा केअर रुग्णालयात चौघांवर उपचार करुन सोडण्यात आले. बीडीबीए रुग्णालयात सात गोविंदांपैकी एकावर उपचार सुर असून सहा जणांना सोडण्यात आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.