@maharashtracity

महापौरांनी मुंबईतील झुणका-भाकर केंद्रांच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा

मुंबई: मुंबईतील झुणका – भाकर केंद्र हे अन्नदाता आहार केंद्रामध्ये परावर्तित करून बंद असलेले जास्तीत जास्त झुणका – भाकर केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी शुक्रवारी राणी बागेतील पेंग्विन सभागृहात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संबंधित साहाय्यक आयुक्त व अधिकारी उपस्थितीत होते.

राज्यात शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता असताना मुंबईत झुणका भाकर केंद्र (Zunka Bhakar kendra) योजना सुरू करून बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला होता. मुंबईत २५७ झुणका-भाकर केंद्र असून त्यापैकी ७० झुणका भाकर केंद्र अन्नदाता आहार केंद्रामध्ये (Annadata Ahar Kendra) परावर्तित झाली आहे. यापैकी २८ केंद्र हे विविध कारणाने निष्कासित करण्यात आली आहे. तर ६ केंद्र हे बंद आहेत.

वारसा हक्काने केंद्र , शासकीय जागेचाही वापर

पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व केंद्र संचालकांची कागदपत्रे तपासून वारसाहक्काने त्यांना ते कसे देता येतील, याची पडताळणी करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच जागेची अडचण असल्यामुळे महापालिकेच्या जागेव्यतिरिक्त राज्य शासनाची जागा उपलब्ध होऊ शकेल का ? याचा अहवाल येत्या गुरुवारपर्यंत सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तद्वारे सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

तसेच, या विषयाबाबत तांत्रिक बाजू तपासून संपूर्ण अहवाल सादर करणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पश्चिम उपनगरे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here