@maharashtracity
मुंबई: राज्यात आतापर्यंत ६६ डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (Delta Plus Variant) रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली.
या ५ मृत्यूत ३ पुरुष आणि २ महिला आहेत. २ मृत्यू रत्नागिरीतील (Ratnagiri)आहेत. बीड (Beed), मुंबई (Mumbai) आणि रायगडमधील (Raigad) प्रत्येकी १ मृत्यू
आहेत. मृत्यू झालेले ५ ही रुग्ण ६५ वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते.
या पाच जणांपैकी दोघांनी कोव्हिशील्डचे (Covishield) दोन डोस घेतले होते. तर, दोघांनी कोणताही डोस घेतला नव्हता. तर एकाच्या लसीकरणाबाबत (vaccination) राज्याला माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान जळगाव १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे ६, पुणे ६, पालघर, रायगड प्रत्येकी ३, नांदेड, गोंदिया प्रत्येकी २, चंद्रपूर,अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड प्रत्येकी १ असे जिल्हा निहाय आकडेवारी सांगून एकूण ६६ रूग्ण असल्याचे सांगण्यात आले.
या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वर्ष वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्ष वयोगटातील १८ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत.