@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ५,५३९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,४१,७५९ झाली आहे. आज ५,८५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३०,१३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७४,४८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात शुक्रवारी १८७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९१,७२,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४१,७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,३५,५१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३०७

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३०७ नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३६८६० एवढी झाली आहे. तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९३७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here