@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ४,६६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,५६,९३९ झाली आहे. काल ३,५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६३,४१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,८४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात रविवारी १३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३६,५९,६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,५६,९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९१,५२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३४५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३४५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४३४९९ एवढी झाली आहे. तर २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९७४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here