@maharashtracity
भांडुप, अंधेरी, खार, धारावीत २४ तास पाणीकपात
मुंबई: भांडुप संकुल येथे उदंचन केंद्रात दुरुस्ती काम आणि पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम २६ ऑक्टोबर रोजी पालिका जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत (Mumbai) सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत १५% पाणी कपात करण्यात येणार आहे.
तसेच, भांडुप (Bhandup), अंधेरी/ पूर्व (Andheri), खार (Khar) व धारावी (Dharavi) या चार विभागात २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी अगोदरच पाणीसाठा करून ठेवावा आणि त्या पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.
मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारऱ्या भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त उदंचन संच काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
तसेच, पवई येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून ते २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
या कारणामुळे, संपूर्ण मुंबईत सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत १५% पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, भांडुप, अंधेरी/ पूर्व, खार व धारावी या चार विभागात २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
खालील विभागात पाणीपुरवठा २४ तास बंद राहील
१) भांडुप विभाग -:
फिल्टरपाडा एस एक्स – ०६ – (२४ तास)- जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
२) के/पूर्व विभाग -: मरोळ
मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता)- चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
३) के/पूर्व विभाग -:
सहार रोड क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता)- कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
४) के/पूर्व विभाग -:
ओम नगर क्षेत्र, केई ०२ – (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजता)- ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
५) के/पूर्व विभाग -:
एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १० – (सकाळी ११ ते दुपारी २ वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
६) के/पूर्व विभाग -:
विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – १०ए – (सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
७) के/पूर्व विभाग -:
सिप्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास)
८) एच/पूर्व विभाग -:
बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
९) जी / उत्तर विभाग -:
धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत) धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
१०) जी / उत्तर विभाग
धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग