@maharashtracity
धुळे: उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ बंधु व डॉ. भाईदास पाटील यांचे आज शनिवार दि. 22 ऑक्टोबर रोजी वृध्दाकाळाने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. काँग्रेस आमदार कुणाल पाटील (Congress MLA Kunal Patil) यांचे ते काका होते.
वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक व धन्वंतरी हरपल्याने वैद्यकिय क्षेत्रावर शोककळा पस
रली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. 23 रोजी धुळे येथील जवाहर मेडीकल फाऊंडेशनचे एसीपीएम मेडीकल कॉलेज मोराणे प्र. ल. येथे दुपारी 12 वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
धुळ्यासह संपूर्ण खान्देशात वैद्यकीय क्षैत्रात नावलौकीक असलेले आणि ज्यांना संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र भीष्माचार्य म्हणून ओळखत होते, असे धुळ्यातील जवाहर मेडीकल फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील (Dr Bhaidas Patil) यांच्यावर नाशिक (Nashik) येथे उपचार सुरु होते.
दिवंगत पाटील यांनी एम. बी. बी. एस. पदवी सन 1963 मध्ये संपादन केली होती. तर सन 1972 मध्ये जगात मानाची समजली जाणारी वैद्यकीय क्षेत्रातील एफ.आर.सी.एस. ची पदवी प्राप्त केली होती. दिवंगत पाटील यांनी अर्ध्या दशकापेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा केली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तज्ञ व निष्णात डॉक्टर घडविण्याचे काम केले.
धुळे (Dhule) जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात भवितव्य घडवता यावे म्हणून त्यांनी बंधु व माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या सहकार्याने जवाहर फाऊंडेशनच्या माध्यमातून मेडीकल कॉलेज, डेंटल कॉलेज, नर्सिग कॉलेज सुरु केले. ते धुळ्यातील नामांकीत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष होते.