@maharashtracity

धुळे: धुळे जिल्ह्यात ९८८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून २ लाख ९८ हजार ९१६ दिवाळी किटच्या (Diwali Ration kit) वाटपाचे नियोजन आहे. साधारण येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील आठ गोदामांमधून हे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती  सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मुकेश कांबळे यांनी दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार येत्या दिवाळीत प्रथमच अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अर्थात केशरी शिधापत्रिकाधारकांना अवघ्या शंभर रुपयांत एक किलो हरबरा (चणा) डाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो पामतेल या चार वस्तू मिळणार आहे.

काय आहे या किटच्या पिशवीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या, महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेल्या, आनंदाचा शिधा लिहीलेल्या पिशवीतून स्वस्त धान्य दुकानांमधून अवघ्या शंभर रुपयांत एक किलो हरबरा (चणा) डाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो पामतेल या चार वस्तू मिळणार आहे.

आठ गोदाम अणि ९८८ स्वस्त धान्य दुकानातून होणार वितरण

धुळे जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ७४ हजार ७३६ तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत अर्थात केशरी कार्डधारक २ लाख २४ हजार १८० इतके लाभार्थी आहेत. असे हे दोन्ही प्रकारचे लाभार्थी मिळून एकूण २ लाख ९८ हजार ९१६ लाभार्थी आहेत. यानुसार धुळे जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ९१६ दिवाळी रेशन किटचे वितरण करण्याची लगभग सध्या सरकारी पातळीवर सुरु झालीय. 

येत्या दोन दिवसात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, पिंपळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, होळनांथे या आठ शासकीय गोदामातून जिल्ह्यातील ९८८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून हे वितरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here