मुंबई
हिंदू धर्मशास्त्रात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्काराचं वर्णन केलेलं आढळतं. ज्यात शेवटचा संस्कार किंवा अंत्यसंस्कार अंतिम असतो. मात्र वेगवेगळ्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर दहन न करता दफन केलं जातं. कुणाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी काही कर्मकांड केले जातात. तर काही लोक वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर गाजत-वाजत मृतदेह स्मशानात घेऊन जातात. तर विवाहित स्त्रीचा मृत्यू झाल्यास तिच्यावर वेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारापूर्वी तिच्यावर 16 संस्कार केले जातात. मात्र यामागे काय कारण आहे?
असं म्हणतात की याचा संबंध रामायणाशी जोडलेला आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सीतेला विवाहासाठी सजवण्यात येत होतं, तेव्हा त्यांच्या आई सुनैना यांनी सीतांना 16 शृंगाराचं महत्त्व सांगितलं. विवाहितेला सौभाग्यवती म्हटलं जातं, जर सौभाग्यवती असताना तिचा मृत्यू झाला असेल तर अंत्यसंस्कारापूर्वी शृगांरासह तिची पाठवणी केली जाते.