@maharashtracity

भांडवली बाजाराच्या प्रवासाची सुरुवात करण्याचा सर्वोत्कृष्ट वेळ कोणता, याविषयीच्या सल्ल्यांचा भडिमार इंटरनेटवर असतो. पहिल्यांदा गुंतवणूक करणारा असो किंवा पहिल्या पिढीतील उद्योजक असो, प्रत्येकासाठी भांडवली बाजार वेगळा असतो. दूरदृष्टीचे उद्योजक नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, प्लॅटफॉर्म विकसित करू शकतात आणि गुंतवणूक संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांचा लाभ घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने भांडवली बाजारात प्रवेश केव्हा करावा याबद्दल मार्गदर्शन करताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी.

बाजाराभोवतीचा दृष्टीकोन लक्षात येणे: शेअर बाजारात निवडीसाठी अनेक साधने आहेत, मात्र त्याकडे जाणारा कोणताही मार्ग समजण्यासारखा नाही. उद्योजकांसाठीही अशीच स्थिती आहे. कारण गरजा-उणीवा या दोन्ही मोठ्या आणि गतिमान आहेत. तथापि, सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी का व कसे याचे मूलभूत ज्ञान झाल्यास गुंतवणूकदार आणि उद्योजक, दोगांसाठी फायद्याचे ठरेल. मग ते पोर्टफोलिओचे वैविध्यीकरण असो, प्रगत चार्टिंग, म्युच्युअल फंड्स किंवा इतर पैलू असो मूलभूत संकल्पना शिकल्याने महत्त्वपूर्ण बदल दिसून येतो.

बऱ्याच सेवा प्रदात्यांना संभाव्य गुंतवणूकदारांचे भवितव्य समजते, तसेच धोकेही लक्षात येतात. यामुळेच आभासी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रसार झाला. यात पेपर ट्रेडिंग किंवा व्हर्चुअल ट्रेडिंग होते. यामुळे संभाव्य गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये खरे पैसे न गुंतवता फंडामेंटल माहिती मिळते. गुंतवणूकदारांना लाइव्ह मार्केटमधील रिअल-टाइम हालचालीही दिसू शकतात. तर दुसरीकडे उद्योजकांना त्यांच्या सेवेत अशा सेवा समाविष्ट करता येतील, जेणेकरून त्यांना यूएक्स अधिक अबाधित राहिल.

गुंतवणूक करणारे तरुण आणि कुटुंबासाठीची गुंतवणूक: मागील पिढ्यांपेक्षा आजचे तरुण त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याबाबत अधिक सतर्क आहेत. मोबाइल अॅपचा प्रसार, सध्याचे डिजिटायझेशन आणि उच्च उत्पन्न या सर्वांमुळे हे परिवर्तन घडले आहे. वेगवान जगात बदलत्या तंत्रज्ञानामुळे जीवन आणि सर्व प्रक्रिया बदलत असताना, मिलेनिअल्सना जाणीव आहे की, तरुणपणातच गुंतवणूक केल्यास भविष्यातील संकटात आपला बचाव होईल. यासह, एखाद्या नव्या गुंतवणूकदाराने तरुणपणीच गुंतवणूक केल्यास त्याला किंवा तिला प्रयोगशीलतेसाठी अधिक वाव मिळू शकतो. चाळीशी किंवा पन्नाशीत असलेल्या लोकांपेक्षा त्यांना जास्त जोखीम पत्करता येऊ शकते. जेणेकरून निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी ते अधिक सुरक्षित बेट लावू शकतात.

जास्त जोखीम घेतल्यास जास्त बक्षीस मिळते, यानुसार, बाजाराचा अनिश्चिततेचा स्वभाव स्वत: लवचिक होऊन काळानुसार ही प्रणाली संतुलित करतो. मात्र, जो नव्याने सुरुवात करत आहे, विविध स्टॉक्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी तज्ञांची मदत घेत आहे, त्याने जोखीम कमी घ्यावी, हेच योग्य आहे. त्याचप्रमाणे, आजच्या कुटुंबांनी आपल्या मुलांमध्ये अधिक चांगले गुण विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी मुलांना साप्ताहिक/ मासिक भत्ते किंवा स्टॉक्स द्यावेत.

वेळेचे महत्त्व आणि लवकर गुंतवणूक करण्याचे इतर फायदे: काहीजण गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायाचा विचार करून त्यात गुंतवणुकीद्वारे सुरक्षित राहतात. यात फिक्स डिपॉझिट, प्रत्यक्ष सोने, रिअल इस्टेट किंवा इतर गोष्टींत पैसे गुंतवतात. ते नेहमीच बाजारात प्रवेश करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. कारण भरपूर भांडवल असल्यास आपल्याला अधिक चांगली बेटिंग करता येईल, असे त्यांना वाटत असते. त्यांचा हेतू योग्य असला तरी बाजाराचे वास्तव या शक्यता नाकारते.

नियमितपणे वाढीव गुंतवणूक करणे चांगले. कारण प्रत्येक गुंतवणूकीतून शेअरचे मूल्य दीर्घकालीन स्वरुपात तीव्रतेने वाढण्याची संधी असते. तसेच बाजार नेहमीच गुंतवणूकदारांच्या बाजूने असते. वाट पाहत बसल्याने अनेकदा चांगले परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे जागतिक निर्देशांकात गुंतवणूक करणे म्हणजे विस्तृत टाइमलाइनवर गुंतवणूक केल्यासारखे असते. ती एक दिशक किंवा अधिक काळासाठी असते. एखाद्याचा विविधतेचा पोर्टफोलिओ आणि वेळेवर गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदाराला चांगली खरेदी करता येते.

त्यामुळे यशस्वी गुंतवमूकदार म्हणून बाहेर येण्यासाठी लोकांनी अडचणींवर मात करणे, लवकर गुंतवणूक करणे तसेच हळू हळू प्रोफाइल तयार करणे आणि दरवर्षी बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here