@maharashtracity
२५ सप्टेंबरपासून ते २ नोव्हेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहीम
आठवडाभरात ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लस टोचणार
आरोग्य मंत्र राजेश टोपे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची संयुक्त बैठक
मुंबई: राज्यातील महाविद्यालये सुरु असून सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरीही महाविद्यालयीन कँपस मध्ये लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेला अटकाव होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयीन सर्वच विद्यार्थ्यांचे व्यापक लसीकरण करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात येत आहे. (vaccination to all college students)
दिनांक २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या आठवडाभरात हे लसीकरण करण्यात येणार असून या आठ दिवसाच्या मोहिम कालावधीत राज्यातील सुमारे ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण करण्याचे नियोजन आहे. (Vaccination drive)
मात्र महाविद्यालयीन प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची माहिती आरोग्य विभागाला उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी सांगितले.
राज्यातील महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र, निर्बंध उठत असताना तसेच दिवाळी तोंडावर असताना संपर्कातून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याची मोहिम छेडण्यात आली आहे. या विशेष लसीकरण सप्ताह आखणीसाठी गुरूवारी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (higher and technical education minister Uday Samant) यांनी संयुक्त बैठक घेतली.
राज्यातील कोविड-१९ आजाराचे निर्बंध शिथील केले जात आहेत. लोकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुन दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (third wave of corona) शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या राज्यात ७० टक्के नागरिकांना किमान एक तरी डोस मिळाला असून उर्वरित लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करायचे असल्याचे टोपे यांनी सांगितल.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माहितीनुसार सुमारे ५ हजार शैक्षणिक संस्था असून यात ३२ ते ३३ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर खासगी संस्थामधील विद्यार्थी धरून ४० लाख विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली जात आहे.
त्यामुळे प्राध्यापकांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांची माहिती देणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. यावर आरोग्य विभाग लसीकरणाचे नियोजन करुन लसीकरण पूर्ण करण्यावर भर देईल असे सांगण्यात आले. कँपसमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी, डॉक्टर, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
दिनांक २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान व्यापक लसीकरण मोहीमेत राज्याच्या प्रत्येक महाविद्यालयात तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होणार आहे. प्रत्येकाची काळजी घेतली जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
तसेच महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास (journey by local train) करण्यात काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयासाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्य सचिवांना दिले आहे. आगामी दोन-तीन दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.