मुंबई

आवळा केस आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यामुळे आवळ्याचा आहारात समावेश करणं चांगलं. यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं. मात्र आवळ्याचं सेवन काही जणांनी टाळायला हवं? याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो.

  • – आवळा केसांसाठी फायदेशीर असतो. मात्र हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी आवळ्याचं सेवन करू नये. अशांसाठी आवळा धोकादायक ठरू शकतो.
  • – ज्यांना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी आवळा खाणं टाळावं. त्यातही अशांनी आवळ्याचा मुरंबाही खाऊ नये.
  • – ज्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी आहे, अशांसाठीही आवळा त्रासदायक ठरू शकतो. यामुळे शरीरात कोरडेपणा वाढू शकतो.
  • – बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी आवळ्यापासून लांबच राहावं. याचं अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठता वाढू शकते.
  • – जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन असेल तर आवळा खाणं टाळावं. अन्यथा युरिन करताना जळजळ होऊ शकते.

(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here