@maharashtracity
लसीची ने-आण करताना घडला प्रसंग
मुंबई: लसीची ने-आण करताना मालाड येथे एका आरोग्य सेविकेला गंभीर अपघात घडला. लस आणायला गेलेल्या या आरोग्य सेविकेच्या रिक्षाला एका मोटरसायकलने ठोकल्याने रिक्षात बसलेल्या आरोग्य सेविका (health worker) रस्त्यावर कोसळल्या. यात यांच्या जबड्याला गंभीर मार बसला असून सध्या त्या केईएम रुग्णालयात दाखल आहेत. (health worker severely injured in an accident)
मात्र लसीची ने-आण करताना सोबत जबाबदार बीएमसी स्टाफ असल्याशिवाय त्या हे काम करत होत्या. त्यामुळे यापुढे सीएचव्ही स्टाफ सोबत असल्याशिवाय आरोग्य सेविका कुठेही बाहेर जाणार नसल्याचे सांगत जखमी आरोग्य सेविकेला रुग्णसेवेचा खर्च तसेच पाच लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पी उत्तर वाॅर्डात दिंडोशी आरोग्य केंद्र आहे. येथील आरोग्य सेविकांना वॅक्सिन (vaccine) न्यायला वाॅर्डला पाठविण्यात आले. लसीची ने-आण करणे आरोग्य सेविकेचे काम नसून आत्याबाई किंवा स्टाफ नर्स काम करत असते.
मात्र या ठिकाणी या आरोग्य सेविकेला पाठविण्यात आले. यात जयश्री कांबळे आणि मेघना दवंडे रिक्षाने वाॅर्डला जात होत्या. मालाड पूर्वेच्या पोद्दार डेपोसमोर एका मोटारसायकल स्वाराने यांच्या रिक्षाला जबरी ठोकले. या धक्क्याने जयश्री कांबळे या रिक्षातून बाहेर पडल्या.
रस्त्यावर आदळताना त्याांच्या जबड्याला जबरी मार बसल्याने त्या रस्त्यावर कोसळून बेशुद्ध पडल्या. मेघना दवंडे यांना देखील दुखापत झाली. मात्र जयश्री याना जबरी मार बसल्याने रस्त्यावरील लोकांनी त्यांना खासगी सुचक हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.
दिड तासानंतर बीएमसी स्टाफ सुचक हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांना गोविंद नगर पालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र गोविंद नगर रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्वरीत केईएम अथवा कुपर रुग्णालयात हलविण्यात सुचवले. सध्या जयश्री कांबळे याना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेला रस्त्यावर अपघात झाल्यास कोण जबाबदारी घेणार असे इतर आरोग्य सेविका प्रश्न विचारत आहेत. तर आरोग्य सेविका बीएमसी स्टाफ सोबत असल्याशिवाय कोणतीही वस्तू आणण्यासाठी कुठेही जाणार नाही, अशी कामगार संघटनेने भुमिका घेतली आहे.
तसे न झाल्यास कामावर बहिष्कार घालण्यात येईल असेही सांगण्यात आले. मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने याचा निषेध करत जखमी आरोग्य सेविकेला रुग्णालयीन खर्च देऊन पाच लाख नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.