५० लाख किंमतीच्या विरोधात पोलीस परिवारांची एकजुट

स्वाक्षरी अभियान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

@maharashtracity

मुंबई: पोलीस परिवाराला हक्काच्या घरासाठी ५० लाख रुपये ही किंमत न परवडणारी असल्यानं सर्व पोलीस परिवारानं (Police Families) याला विरोध केला. लवकरच पोलीस परिवारातील सदस्य स्वाक्षरी मोहिम राबवणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून परवडणारी किंमत जाहिर करा, अशी मागणी करणार आहेत. जोपर्यंत परवडणारी किंमत (affordable house) जाहिर होत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार पोलीस परिवरांनी घेतला आहे.

वरळी बीडीडी चाळ (BDD Worli Chawl) येथे पोलीस परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ५०० हून अधिक लोकं उपस्थित होते. गेली अनेक वर्ष निवृत्त पोलीस आणि पोलीस पत्नी हक्काच्या घरांसाठी लढा देत आहेत. त्यात तरूणांच्या सहभागाने या लढ्याला आणखी बळकटी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here