@maharashtracity

मुंबई: पोलिसांचा विरोध आणि राज्य सरकारने ओमीक्रोनचे (Omicron) कारण देत शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसासाठी मुंबईत जाहीर सभा घेण्यास बंदी घातली असतानाही एमआयएम चे (MIM) औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅली (Tiranga Rally) मुंबईत पोहोचली. मुस्लिमांना आरक्षण मिळायला (Muslim Reservation) हवे या मागणीसाठी निघालेल्या या रॅलीचे रूपांतर चांदीवली येथे जाहीर सभेत झाली. यावेळी खासदार जलील यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ (Law re to video – play the video) असे सांगत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) मुस्लिम आणि अन्य नेत्यांनी मुस्लिम आरक्षण बाबत विरोधात असतांना केलेले वक्तव्य दाखवले आणि सत्तेत आल्यावर हेच नेते कसे आपल्याला मुंबईत येण्यापासुन रोखत होते, हे उघड केले.

जलील म्हणाले, औरंगाबाद ते मुंबई (Aurangabad to Mumbai) या 17 तासाच्या प्रवासात ठिकठिकाणी मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईच्या वेशीवर वाशी येथे इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता की मी खासदार आहे की आतंकवादी (Militant) असा प्रश्न आपल्याला पडला असे जलील म्हणाले.

“आम्ही संपूर्ण प्रवासात कुठल्याही पक्षाचा झेंडा लावला नव्हता. होता तो फक्त तिरंगा, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो. वाशीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने झेंडा गाडीत काढून ठेवा आणि मग पुढे प्रवास करा असा सल्ला दिला. आम्ही झेंड्यासह गाडीतून खाली उतरून चालू लागलो तेव्हा पोलिसांना त्यांची चूक समजली आणि मी मुंबईत पोहोचलो,” अशा शब्दात खासदार जलील यांनी अनुभव सांगितला.

ते म्हणाले, विरोधात असतांना सगळे नेते मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने बोलायचे तेव्हा मी आमदार होतो आणि मला वाटायचे सर्व पक्ष आपल्या बाजूने आहेत. आज हेच लोक सत्तेत आले पण दोन वर्षात आमच्याकडे दुर्लक्ष केले जातेय.

जलील यांनी व्हिडीओ लावून नवाब मलिक (Nawab Malik), अबू असीम आजमी (Abu Asim Azmi), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), हुसेन दलवाई (Hussain Dalwai), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), माणिकराव ठाकरे (Manikrao Thakare) आणि अन्य नेते कसे तावातावाने सभागृहात आणि सभागृहाबाहेर मुस्लिम आरक्षणावर बोलत होते, त्याचे सभेला दर्शन घडवले.

आता परवानगी घेऊन आलो आहोत, आरक्षण नाही दिले तर यापुढे न सांगता येऊ, असा इशारा जलील यांनी दिला. “हे (सरकार) आपल्याला घाबरतात आणि त्यांना अजून घाबरायचे असेल तर लवकरच सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशन (winter session) दरम्यान विधानभावनाबाहेर (Vidhan Bhavan) धडक द्या, आंदोलन करा, अशी सूचना इम्तियाज जलील यांनी केली.

मुंबईत 4 आमदार निवडून आणा असेही आवाहन त्यांनी केले.

राज्यातील वक्फ च्या 93 हजार जमिनीच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित करून जलील यांनी या जमिनी कोणाला देण्यात आल्या याचा हिशेब सरकारकडून मागितला. वक्फ बोर्डचा (Waqf board) सदस्य झाल्यापासून अशा जमिनी विकत घेणाऱ्या धानदांडग्याविरुद्ध 9 गुन्हे आपण दाखल करायला भाग पाडले, असेही जलील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here