@maharashtracity
मुंबई
राज्यात साेमवारी एकाही काेराेनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नाेंद झाली नाही. गेल्या पंधरा दिवसात राज्यात शून्य कोरोना मृत्यू नोंद होण्याची चौथी वेळी आहे. या पूर्वी २, ७, ९ तसेच २१ मार्च या दिवशी शून्य मृत्यू नोंद करण्यात आली. दरम्यान, राज्यात साेमवारी ९९ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. तर आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७२,५१२ झाली आहे.
आज १८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२३,४६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८९,८६,९७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७२,५१२ (०९.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत २८ बाधित
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,६३७ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९३ एवढी झाली आहे.