मुंबई
काहीजणं सकाळी व्यायाम करतात तर काहींना सकाळी उठणं शक्य होत नसल्याने ते सायंकाळ व्यायामासाठी ठेवतात. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, सकाळी असो वा सायंकाळी परंतू व्यायाम (What is the best time to exercise) करणं आवश्यक आहे. मात्र अमेरिकन कौन्सिल ऑफ एक्सरसाइजद्वारा प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात कधी व्यायाम करणं फायदेशीर असतं याचा उल्लेख केला आहे.
सकाळी व्यायाम करणं चांगलं का?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जीममध्ये जायचं असेल किंवा धावायचं असेल किंवा अगदी घरातच व्यायाम करायचा असेल तर सकाळी लवकर उठा. याचे अनेक फायदे आहेत…
दिवसभर सक्रिय राहता…
सकाळच्या वेळेत व्यायाम केल्याने मेंदूत न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. ते मेंदू आणि इंद्रियांना सक्रीय करण्यास मदत करतात. याशिवाय सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर शरीर अॅक्टिव राहतं.
फॅट लॉसमध्ये मदत
सायंकाळच्या तुलनेत सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी वितळयाचं प्रमाण वाढतं. कारण शरीरात साठलेली चरबी सकाळच्या व्यायामासाठी इंधन म्हणून वापरली जाते. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर, शरीर त्याचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करतं.
हॅपी हार्मोन
व्यायाम करताना शरीरातून एंडोर्फिन होर्मोन बाहेर पडतो, ज्याला हॅपी हार्मोनदेखील म्हटलं जातं. सकाळी व्यायाम केल्याने हा हार्मोन दिवसभर तुमचा मूड चांगला ठेवतो. त्यामुळे दिवसभरत तुम्ही कामात फोकस आणि अलर्ट राहाल.
एकंदर या अहवालानुसार, सकाळी व्यायाम करणं चांगलं मानलं गेलं आहे. मात्र दुपारी आणि सायंकाळी व्यायाम करणंही चांगलंच आहे. याचेही अनेक फायदे आहेत.