मातृमहोत्सव सोहळा दिमाखात संपन्न
Twitter: @maharashtracity
कल्याण: विश्वमांगल्य सभा या सामाजिक संस्थेचा मातृ महोत्सव सोहळा नुकताच कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला. संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चार विषयांवर काम करणारी सामाजिक संस्था म्हणून विश्वमांगल्य सभेकडे पाहिले जाते. आदर्श समाज घडवायचा असेल, सुसंस्कारित पिढी घडवायची असेल तर आदर्श माता घडवली पाहिजे हा उदात्त हेतू मनात ठेवून संस्थेचे कार्य सुरू आहे. विश्वमांगल्य सभा या संस्थेचे मातृशक्ती जागृतीचे काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत विश्वमांगल्य सभा संस्थेच्या कल्याण जिल्हाध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आठ संस्कारवर्गात जाणाऱ्या छोट्या मुलांनी सादरीकरण केले. यावेळी सभेच्या राष्ट्रीय संघटनमंत्री डॉ. वृषाली जोशी, डॉ. संगीता गोडबोले, मुंबई प्रांत अध्यक्षा नलिनी हावरे, डॉ. दीपाली देशमुख, रेखा चौधरी, ज्योती भोईर, मनीषा केळकर, निता देसले, प्रीती दीक्षित, विश्व हिंदू परिषदेच्या ॲड. सुधा जोशी, विश्वमांगल्य सभेच्या सोनाली देशपांडे, प्राची जोशी, समृध्दी देशपांडे, दिपा शाह, प्रिती चित्ते, माजी नगरसेविका वैशाली भोईर, ॲड. सविता गुप्ता, डॉ उपेंद्र डहाके, काजल अविनाश पाटील, भावना मनराजा, स्नेहल सोपरकर आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.