मुंबई
हार्ट अटॅक दरम्यान हृदयाच्या ठोक्यावर परिणाम होता? काही जणांनुसार हार्टअटॅकदरम्यान हार्ट रेट वाढतो. तर काहींनुसार हार्टअटॅक दरम्यान हार्ट कमी होतो.
यावरुन तुमच्यासमोरही अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील, या लेखात आपण हार्ट अटॅक आणि हार्ट रेट बाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.
हार्ट अटॅकदरम्यान हार्ट रेटमध्ये कसा होतो बदल?
सर्वप्रथम हार्ट रेट म्हणजे काय हे जाणून घेऊया. सोप्या शब्दात, सांगायचं झालं तर आपले हृदय एका मिनिटात जितक्या वेळा धडधडते त्याला हार्ट रेट म्हणतात. सामान्य माणसाचे हृदय एका मिनिटात 60 ते 100 वेळा धडकते. हार्ट अटॅक दरम्यान तुमच्या हृदयाच्या गतीवर म्हणजेच हार्ट रेटवर परिणाम होऊ शकतो, परंतु त्यात काही बदल होत नाही असेही होऊ शकते.
हार्ट अटॅकचे प्रकार
हार्ट अटॅकमध्ये, हृदय वाढू शकते आणि काही प्रकरणांमध्ये ते कमी देखील होऊ शकते. हे पूर्णपणे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. वास्तविक हार्ट अटॅकचे तीन प्रकार असतात.
पहिला म्हणजे सेगमेंटल एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI), ज्यात खूप गंभीर हार्ट अटॅक म्हणता येईल. त्याच्या बहुतेक प्रकरणांमध्ये हार्ट रेट वाढतो. काहीवेळा ते हृदयाच्या इलेक्ट्रिक सिस्टमला हानी पोहोचवते, ज्यामुळे हार्ट रेट कमी होतं.
हृदयविकाराचा आणखी एक प्रकार म्हणजे नॉन-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (NSTEMI). यामध्ये हृदयाचे नुकसान कमी होते, परंतु हार्ट रेट वाढतो. कधीकधी हृदयाच्या धमन्यांमधील अडथळ्यासह इतर काही अंतर्निहित समस्यांमुळे (ताप किंवा रक्तस्त्राव) देखील हार्ट रेट शकते.
तिसरा कोरोनरी आर्टरी स्पाज्म. जेव्हा धमनीच्या भिंती कडक होतात आणि हृदयाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो तेव्हा हे घडते. याचा परिणाम हार्ट रेटवर होऊ शकतो.
हार्ट रेट वाढणे हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे का?
अनेक लोकांमध्ये असा संभ्रम आहे की हार्ट रेट वाढणे हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते, परंतु ते तसं नाहीये. सीडीसी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, वाढलेला हार्ट रेट हा कोणत्याही प्रकारे हार्ट अटॅकचं लक्षण नाही.