मुंबई

Google वेळोवेळी नकाशात वेगवेगळे फीचर्स अॅड करतं. यात ऑन-डिव्हाइस लोकेशन हिस्ट्री, टाइमलाइन क्रिएशन आणि ब्लू डॉट फीचर्स देखील आहे जे वापरकर्त्याच्या सध्याच्या लोकेशनबद्दल माहिती देते.

गुगलने अलीकडेच सांगितलं की, आता वापरकर्त्यांना कोणत्याही ठिकाणची लगेचची माहिती मिळवता येईल आणि त्यांना स्थान इतिहास, दिशा शोध आणि भेटी हटविण्याचा पर्याय देखील दिला जाईल.

उदाहरणादाखल, गुगल नकाशाच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी गेलात आणि तुम्हाला तेथील सर्व अॅक्टिव्हिटीबाबत सांगण्यात आलं. यानंतर तुम्हाला हे सर्व डिलीट करण्याचाही पर्याय दिला जाईल. सध्या हा पर्याय उपलब्ध नाही. यावर काम सुरू असून लवकरच हा पर्याय वापरकर्त्यांना मिळणार आहे. जे वापरकर्ते लोकेशन हिस्ट्री हा पर्याय वापरतात, गुगलकडून त्यांना टाइमलाइन स्टोअर करण्याचा पर्याय दिला जाईल.

टेक जायंटने लोकेशन हिस्ट्री सेव्ह करण्याचा अमाऊंट ऑफ टाइममध्ये बदल केला आहे. जर तुम्ही डिव्हाइसमध्ये पहिल्यांदा हा फीचर सुरू केला तर ९० दिवसांसाठी स्टोअर करू शकता. पूर्वी हा १८ महिन्यांसाठी उपलब्ध होता.

व्यक्तीचे लोकेशन सांगणाऱ्या ब्लू डॉट फीचरमध्येही बदल केले जातील. यामध्ये वापरकर्त्यांना अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही कोणतीही लोकेशन हिस्ट्री शोधू शकता. गुगलचे म्हणणे आहे की वापरकर्त्यांना यासंबंधीच्या नोटिफिकेशन्स देखील देण्यात येतील. तुम्हाला ही अपडेट्स मिळाल्यावर, तुम्ही ते देखील वापरू शकाल. हे 2024 मध्ये Android किंवा iOS वर उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here