नवी दिल्ली

आयआयटी संस्थांमध्ये अंतिम प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत प्लेसमेंटमध्ये यंदा 15 ते 30 टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आलं आहे.
संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप प्लेसमेंट मिळू शकले नसल्याची घटना प्रथमच घडत आहे. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. मोठमोठ्या कंपन्यांकडून कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी लगेच घेतले जातात. आयआयटीमधील प्लेसमेंटशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये दिल्ली, बॉम्बे, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी आणि वाराणसी आयआयटीचा समावेश आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटी संस्थांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास भविष्यात मोठ्या पगाराची हमी असते. गेल्या वर्षी, टेक इंडस्ट्री मंदीतून जात असतानाही, आयआयटीमधील प्लेसमेंट खूपच चांगले होते.
यंदा आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनाही प्लेसमेंटसाठी झगडावे लागत आहे. याची अनेक कारणे आहेत. कंपन्या कमी भरती करत आहेत. काही कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी होत नाहीत. एकूणच, तांत्रिक मंदीमुळे नोकरभरती कमी झाली आहे.
प्लेसमेंटमध्ये 30% पर्यंत घसरण
आयआयटी-खड़गपूरच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ज्या कंपन्या पूर्वी 8 ते 10 विद्यार्थ्यांची भरती करत होत्या, त्या यंदा एक किंवा दोन जणांना कामावर घेत आहेत. काही कंपन्या कॅम्पसमध्ये येतात, पण भरती करत नाहीत. आयआयटीच्या आणखी एका माजी विद्यार्थ्याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ऑफर्स ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आयआयटी संस्थांमधील अंतिम प्लेसमेंट १ डिसेंबरपासून सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here