नवी दिल्ली
इंडियन प्रीमियल लीगच्या (IPL) इतिहासातील सर्वात मोठी बोली आज लागली. ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सवर पैशांचा पाऊस झाला. त्याला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली 20.50 कोटी रुपये लावून सनराइजर्स हैदराबादने आपल्या टीममध्ये सामील केलं आहे.
यापूर्वी सर्वात महागडा खेळाडूचा रेकॉर्ड इंग्लंडच्या सॅमने केला आहे. सॅमला गेल्या सीजनमध्ये 18.50 कोटी रुपयात पंजाब किंग्जने खरेदी केला होता. मात्र यंदा तो रेकॉर्ड मोडला.
पॅटवर पहिली बोली चेन्नई सुपर किंग्जने लावली होती. बेस किंमत 2 कोटींपासून सुरू झाली होती, जी 20.50 कोटींपर्यंत थांबली. दुसरी बोली मुंबई इंडियन्सने लावली. 4.8 कोटींपर्यंत दोन्ही टीममध्ये चुरस सुरू होती. येथे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रवेश केला. आरसीबी आणि चेन्नई यांच्यात 7.60 कोटी रुपयांपर्यंत चुरस होती. यानंतर सनरायझर्स हैदराबादने मैदान जिंकलं आणि पॅटला आपल्या टीममध्ये घेतलं.
कदाचित पॅट कमिन्सलाही त्याच्यासाठी एवढी चुरस होईल यावर विश्वास बसला नसेल. गेल्या सीजनमध्ये कमिन्सने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. उल्लेखनीय म्हणजे कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाचा पराभव करून विश्वविजेते होण्याचा मान मिळविला होता.