@maharashtracity
मुंबई: अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर येथील जुन्या मार्केटचा पीपीपी (खाजगी सहकारी भागीदारी तत्वावर – PPP) पुनर्विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
हा प्रस्ताव अधिक आकर्षक ठरावा यासाठी त्यात मुदतवाढीची तरतूद ठेवण्याचे देखील निश्चित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या मार्केटमध्ये १०८ गाळेधारक आहेत. या मार्केटच्या पुनर्विकासासाठी ५० कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी नगरविकास विभागाला जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आलेत. या प्रकल्पासाठी गॅप फंडींग नगर विकास विभाग करेल.
या बैठकीला खासदार डॉ श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) अणि आमदार डॉ बालाजी किणीकर (MLA Balaji Kinikar) उपस्थित होते.