@maharashtracity

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार कधी ?

कोकणवासीयांना पडलाय प्रश्न

महाड (रायगड): सन २०२१ या वर्षाची आकडेवाडी पहिली तर संपूर्ण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पलस्पे ते कोकणच्या तळापर्यंत ३४८ अपघात झाले. या अपघातात ४५७ प्रवाशी जखमी झाले तर ८० लोकांचा बळी गेला.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची (Mumbai – Goa National Highway) हद्द पनवेल, पलस्पे ते गोवा बॉर्डरपर्यंत जवळपास ५५० किलोमीटर अंतर एवढी आहे. या महामार्गावर पलस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण , हातखंबा आणि कसाल असे ७ महामार्ग वाहतूक शाखा पोलीस केंद्र आहेत. या सर्व केंद्राकडून २०२१ मधील अपघाताची वरीलप्रमाणे माहिती मिळाली.

पूर्वी असलेला अरुंद महामार्ग, वाहनांची वाढती संख्या, ठीक ठिकाणी असलेली वळणे आणि त्या पासून होणारे अपघात पाहता केंद्र सरकारने या महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेली १० वर्षापूर्वी सुरवात केली. या कामाचे २ टप्पे केले.

पहिला टप्पा पालस्पे ते इंदापूर आणि दुसरा इंदापूर ते गोवा बॉर्डर. पहिल्या टप्प्याच्या कामाला १० वर्ष पूर्ण झाली असली तरी आज ही ५० टक्के काम शिल्लक आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ३ वर्ष झाली असली तरी याचे देखील काम ४० टक्के शिल्लक आहे.

आज ही या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे कोकणात (Konkan) जाणाऱ्या वाहनांना अपघातांना (road accident) सामोरे जावे लागत आहे. कोकणातील गणपती (Ganapati festival) आणि होळी (Holi festival) हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे या महामार्गावर त्या सणानिमित्त वाहनांची मोठी गर्दी होते.

त्याच बरोबर दापोली (Dapoli), मुरुड, अलिबाग (Alibaug) या ठिकाणी पर्यटनस्थळ असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून पर्यटक (tourist) येत असतात. तर गणपतीपुळे (Ganpatipule) देवस्थान असल्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) राजधानी असलेला रायगड किल्ला (Raigad fort) आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Amedkar) यांची क्रांतीभूमी असलेला महाड (Mahad) शहरदेखील कोकणात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे या महामार्गावर नेहमी वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असते.

या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर तरी ही अपघात मालिका कमी होईल का? असा प्रश्न सामान्य कोकणवासीयांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here