संयुक्त मुख्य परिक्षा २०२० पात्र उमेदवारांच्या परीक्षा रखडल्या
नीता ढमालेंच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाची उपमुख्यमंत्र्यांची भेट
@maharashtracity
नंदादीप प्रतिष्टानच्या ( nandadip pratishthan) अध्यक्षा निता ढमाले ( nita dhamale) यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मुख्य परिक्षा २०२० चे पात्र उमेदवारांचे शिष्ट मंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेऊन संयुक्त मुख्य परीक्षा गट-ब २०२० चे नियोजन तातडीने करण्याबाबत निवेदन दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( Maharashtra Public Service Commission) ४सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब घेतली होती.त्यानंतर सदर परीक्षेची मुख्य परीक्षा २९ व ३० जानेवारीला घेण्याचे नियोजले होते.सदर परीक्षेस जवळपास १३ हजार उमेदवार पात्र होते. मात्र निवडीचे निकष योग्य नाहीत हे कारण घेऊन काही अनुउत्तीर्ण उमेदवार व काही सामाजिक संस्था विविध प्रशासकीय न्यायाधिकरण व मुंबई उच्च न्यायालयात (high court) गेल्या त्यामुळे सदर परीक्षा रखडलेली आहे.
मुंबई व नागपूर न्यायधिकरनं ने निवडीचे निकष योग्य असल्याचा निर्णय दिला आहे मात्र मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण पटलावर नसल्याने परीक्षा लांबणीवर पडली आहे त्याचा फटका 13 हजार उमेदवारावर पडला आहे.त्यासाठी राज्य शासनाने महाअधिवक्ता च्या मार्फत न्यायालयिन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुण संयुक्त मुख्य परीक्षा गट ब २०२० तातडीने घेण्यात यावी असे निवेदन नीता ढमाले यांनी दिले आहे.
राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राची दखल घेत लवकरच महाअधिवक्ताना योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निता ढमाले यांच्या मुळे 13 हजार उमेदवारांना न्याय मिळेल अशी आशा सर्व पात्र उमेदवार करत आहेत.व जोपर्यत न्याय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे मत यावेळी निता ढमाले यांनी व्यक्त केले.