@maharashtracity
शिवसेना विधानपरिषद सदस्यांची बैठक “मातोश्री” (matoshree) येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे( uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना प्रदान करण्यात आले. तसेच विधानपरिषद सभागृहात शिवसेनेची सदस्य संख्या जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा शिष्टमंडळाने पत्राच्या माध्यमातून केला आहे. सदरील शिवसेना शिष्टमंडळात विधानपरिषद सदस्य आ.अंबादास दानवे, आ.सचिन अहिर, आ.मनीषा कायंदे, आ.विलास पोतनीस, आ.सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
या विषयी झालेला ठराव रितसर शिवसेना सदस्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधिमंडळातील अधिकारी श्री.शिवदर्शन साठे, पुष्पा दळवी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.