मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

@maharashtracity

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat) पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषित केले आहे.

याशिवाय हे दूषित पाणी (contaminated water) पिऊन आजारी पडलेल्याना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. या नागरिकांपैकी 3 जणांचा मृत्यु झाला.

या घटनेची बातमी कळताच दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे असेही त्यांनी सांगितले.

यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील. तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here