धुळे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (MVA govt) दोन वर्षांच्या काळात निष्काळजीपणा केल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (Political reservation to OBC) प्रश्‍न निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या याच उदासिनतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी भाजपा (BJP) धुळे महानगर व भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

शहरातील क्युमाईन रोडवर सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खा. डॉ.सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here