@maharashtracity

मुंबई: काँंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेनभाई दलवाई (सिनियर) (Hussain Dlawai senior) यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.

नुकतेच त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. ते समाजवादी व काँग्रेसी विचारसरणीचे होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा, राजशिष्टाचार, बंदरे या मंत्रीपदाची जबाबदारी संभाळली होती. दलवाई यांना स्व. यशवंतराव चव्हाण (Y B Chavan) व वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.

दलवाई हे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. १७ ऑगस्ट १९२२ रोजी दलवाई यांचा जन्म झाला. ते चिपळूणमधील मिरजोळी गावचे मूळ रहिवाशी होते. कोकणातील सुरुवातीच्या काळातील मोजक्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होता. कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेत आमदार, राज्यसभेत व लोकसभेत खासदार व राज्यात मंत्री अशी त्यांची दिमाखदार राजकीय कामगिरी राहिली आहे. लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here