@maharashtra.city

मुंबई: राज्यात शुक्रवारी २६३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,८०,३३७ झाली आहे. काल २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३१,०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,४५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी २ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०५,०९,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८०,३३७ (०९.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १५५ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५५ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,६०,४१० रुग्ण आढळले. तसेच १ रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६४ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here