बिरादार,पठाण यांची घरी आनंदाचे वातावरण

मुले सुखरूप परत आल्यामुळे आईच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू

महाड (रायगड): रशिया व युक्रेन (Russia- Ukraine war) या देशात मोठे घनघोर युद्ध पेटले आहे. अशात भारत (India) देशातील शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी या देशात अडकले आहेत. युक्रेन येथील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेली रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad, Raigad) तालुक्यातील बिरवाडी येथील रहिवाशी खूर्रम बिरादार आणि शोयब पठाण ही मुले आपल्या घरी कुटूंबात सुखरूप पोहचली. त्यामुळे सारे कुटूंब आंनदीत झाले आहेत. मुले घरी सुखरूप पोहोचल्याने आई-वडिल यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पहायला मिळाले.

खूर्रम, शोयब या दोघांनी या युद्धजन्य परिस्थितीत कसे दिवस काढले आणि कसे पोहचलो याचा अनुभव सांगितला. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी (Indian Students stranded in Ukraine) युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करावे तरच खरा माझा आनंद होईल, असे खुर्रमची आई म्हणाली.

दरम्यान, रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये मिसाईल हल्ला केला. त्या हल्ल्यात काही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आपली मुले सुखरूप घरी यावीत यासाठी पालक प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here