@maharashtracity

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी केली आहे.

पटोले पुढे म्हणाले की, ईडीने (ED) मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यानी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहा (Amit Shah) यांना पाठविले का? असा सवाल पटोेले यांनी उपस्थित केला.

पटोले म्हणाले, केंद्र सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नसल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय (CBI), एनसीबी (NCB), एनआयएच्या (NIA) माध्यमातून मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे.

सरकार पाडण्यासाठी उताविळ झालेले भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्याचे आरोप करणारे सोमय्यासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे असेही पटोले म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचे काँग्रेस पक्षाने वारंवार सांगितले. मात्र कारवाई न करता घोटाळेबाजांना क्लिन चिट दिली. आता मविआ सरकारने या घोटाळ्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here