@maharashtracity
मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. त्याच वेळी लाट ओसरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. आतातरी मास्कपासून सुटका मिळू शकते का? हा सर्वसामान्यांचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) याना पत्रकारांनी विचारला असता यावर पवार शैलीचे उत्तर देण्यात आले.
कोरोना नियंत्रणात (corona under control) येत असला तरी राज्यातून संपूर्ण कोरोना गेल्याशिवाय मास्क मुक्ती (no mask) मिळणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मास्कमुक्तीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्च झाली नाही. कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावयचा, असे पवार यांनी स्पष्ट केले.
आता तिसरी लाट आटोक्यात येत आहे. मुंबईसह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. राज्यातील लसीकरण बऱ्यापैकी झाले आहे. प्रवासीदेखील वाढले असताना आता मास्कला ही सुटी मिळेल, असे वाटत असताना पवार यांनी मास्कमुक्तीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असताना राज्य महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का, यावर पवार म्हणाले की, कोरोना संपल्याशिवाय मास्क मुक्ती नाही. मास्कमुक्तीबाबतची माहिती पत्रकर परिषद घेऊन देण्यात येईल असे अजित पवार यांनी सांगितले.