@maharashtracity

घनकचरा खाते ५७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

आरोग्य खाते ४५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

२ खातेप्रमुख अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई: मुंबईत मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव (covid pandemic) सुरू झाला. कोविडच्या दोन लाटा परतावून लावणाऱ्या व आता तिसऱ्या लाटेचा (third wave of covid) मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) विविध खात्यातील २५९ अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा कोविड बाधा होऊन मृत्यू झाला आहे.

मात्र, या २५९ पैकी २२२ कर्मचारी ,अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र (death certificate) उपलब्ध झाले असून उर्वरित ३७ मृत अधिकारी, कर्मचारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणे बाकी आहे.

आतापर्यंत एकूण ७ हजार ६८ अधिकारी व कर्मचारी यांना कोविडची बाधा झाली असून त्यापैकी ६ हजार ५२९ अधिकारी, कर्मचारी हे यशस्वी उपचारानंतर कोविड मुक्त झाले आहेत.
अद्यापही २८० कोविड बाधित कर्मचारी, अधिकारी उपचार घेत आहेत.

या मृत २५९ मध्ये, संवर्ग ‘अ’ मधील ४, ‘ब’ मधील १३, ‘क’ मधील ४४, ‘ड’ मधील १९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून कोविड -१९ (covid-19) चा प्रादुर्भाव सुरू झाला होता. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा आरोग्य व घनकचरा विभाग (waste management) जास्त प्रमाणात काम करीत आहे. कोविड बाधितांना वेळीच उपचार देऊन त्यांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर (doctors), नर्स (nurses), वॉर्डबॉय (ward boys), कर्मचारी आदी दिवस- रात्र राबत आहेत.

तर सफाई खात्यातील कर्मचारी हे दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहर, उपनगरे आणि उद्याने स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत.

त्या व्यतिरिक्त पालिकेच्या सुरक्षा खाते (security), शिक्षण खाते (education), इतर खाते येथील कर्मचारी, अधिकारी, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपायुक्त, सहाय्यक आयुक्त हे सुद्धा दिवस-रात्र राबत होते.

मात्र कोविड सारख्या राष्ट्रीय संकटाला तोंड देताना, मुंबई महापालिकेचे विविध खात्यातील ७ हजार ६८ अधिकारी, कर्मचारी, कोविड बाधित झाले. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यापैकी ६ हजार ५२९ कर्मचारी, अधिकारी हे योग्य उपचारानंतर कोविड मुक्त झाले. ते आजही आपले कर्तव्य बजावत आहेत. तर २५९ कर्मचारी, अधिकारी यांचा कोविडच्या लढ्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत कर्मचारी, अधिकारी यांची खातेनिहाय माहिती

खाते प्रमुख – २ मृत

कर व संकलन खाते – ७ मृत

घनकचरा खाते – ५७ मृत

आरोग्य खाते – ४५ मृत

अग्निशमन दल खाते – १२ मृत

सुरक्षादल खाते – १४ मृत

परिमंडळ – एक – ५ मृत

परिमंडळ – दोन – ४ मृत

शिक्षण खाते – ४ मृत

इतर विभाग खाते – १०० मृत

घनकचरा कंत्राटी कामगार – ९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here