@maharashtracity
विधान परिषदेतील आठ सदस्यांना निरोप
मुंबई: मला साथ दिली तशी उद्धवला साथ द्या असे बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) अखेरच्या दिवसात सांगितले होते. त्याप्रमाणे मी शेवटपर्यंत शिवसेना (Shiv Sena) सोडणार नाही. बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल असे मी काही करणार नाही, असे भावनिक उद्गार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काढले.
निवृत्त होणाऱ्या आठ विधान परिषद सदस्यांना आज वरिष्ठ सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी कदम म्हणाले, दरम्यानच्या कालावधीत मी संपूर्ण समाधानी असून माझा मुलगा हि आता आमदार आहे. कोणत्याही पक्षात भांड्याला भांडे लागतेच. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ आहे.
रामदास कदम, अमरीश पटेल, सतेज पाटील, अरुण जगताप, भाई जगताप, प्रशांत परिचारक , गोपीकिशन बजोरिया, गिरिश्चंद्र व्यास या सदस्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहातील बहुतांश सदस्यांनी निरोपाची भाषणे केली.
कोकणात सिंचन (Irrigation) व्यवस्था अगदी कमी असल्याचे शल्य असल्याचे सांगत रामदास कदम यांनी येथील सिंचन व्यवस्था सुधारली पाहिजे यावर भर दिला. त्याच वेळी राजकारणात आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे सांगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला साथ दिली तशी उद्धव याना साथ द्या या आज्ञांचे पालन केले जात आहे. मी पक्षाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचे कदम म्हणाले.
Also Read: आपत्ती हानी कमी करण्यासाठी ३२०० कोटीचा आपत्ती सौमिकरण प्रकल्प
सदस्यांना निरोप देताना उपसभापती नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) म्हणाल्या कि, रामदास कदम विधानपरिषदेचे सदस्य, शिवसेनेचे नेते त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी सभागृहात अनेक प्रश्न मांडले. कदम हे अभ्यासू सदस्य तसेच ते सर्वांचे मित्र आहेत.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. गिरीश व्यास यांच्यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, ते भाजपचे ते कडवट कार्यकर्ते आहेत. तर कदम यांचा शाखाप्रमुख ते खेडमधील निवडणूक असा राजकीय प्रवास दरेकर यांनी उलगडून दाखवला.
गोपीकिशन बजोरीया यांचे शिक्षणात काम, अकोल्यातील विमानतळ प्रश्न लक्षात राहणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.