@maharashtracity

आगीच्या चौकशीचे आदेश

मुंबई: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात शनिवारी आग लागली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 7 जणांना वाचविण्यात यश आले असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री (DCM Ajit Pawar) यांना देखील माहिती देण्यात आली. या रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कोरोना (corona) सुरु झाल्यापासून राज्यात रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. भांडुप, विरार, भंडारा, नाशिक, ठाणे आणि मुलुंड या ठिकाणावरील रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना मागील वर्षभरात घडल्या. आजच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असून रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. तसेच दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून होणार आहे. या चौकशीचा अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here